Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आयपीएलने नाकारले; मात्र आता ‘हा’ खेळाडू खेळणार थेट टीम इंडियात

मुंबई – फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या (SRI lanka) टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात धक्कादायक निवड सौरभ कुमारची (Saurabh Kumar) झाली आहे. 28 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू सौरभचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या आयपीएल मेगा लिलावात सौरभला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. सौरभची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. 2021 च्या लिलावात सौरभला पंजाब किंग्जने फक्त 20 लाख रुपयांना विकत घेतले होते.

Advertisement

सौरभ कुमार हे भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे. सौरभने सर्व्हिसेससाठी 2014 मध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध पहिला रणजी सामना खेळला होता. नंतर तो त्याचे गृहराज्य उत्तर प्रदेशकडून खेळू लागला.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

196 बळी घेतले आणि दोन शतके झळकावली
सौरभ कुमारने आतापर्यंत 46 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 24.15 च्या सरासरीने 196 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 16 वेळा एका डावात 5 आणि 6 वेळा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. एक फलंदाज म्हणून त्याने 29.11 च्या सरासरीने 1 हजार 572 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे.

Advertisement

भारत अ संघासोबत गेला होता दक्षिण आफ्रिकेला
सौरभ कुमार हा देखील दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा एक भाग होता. मात्र, तेथे त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने दोन अनधिकृत कसोटीत चार विकेट घेतल्या आणि केवळ 23 धावा केल्या.

Advertisement
Advertisement

Leave a Reply