Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

प्रतिक्षा संपली; BCCI ने केली मोठी घोषणा, आता ‘हा’ खेळाडू करणार संघाचा नेतृत्व

मुंबई – श्रीलंकेविरुद्धच्या (SRI lanka) तीन टी-20 आणि दोन कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (19 फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी संघाची घोषणा केली. यादरम्यान रोहित शर्माची(Rohit Sharma) भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. तो भारताचा कसोटीतील 35 वा कर्णधार असेल. चेतन शर्मा (Chetan Sharma) म्हणाले की रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह पुढील कसोटी कर्णधार म्हणून तयार होतील. या तिघांपैकी कोणीही भविष्यात भारताचे नेतृत्व करेल. रोहितचे लक्ष टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकावर अधिक आहे.

Advertisement

विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 आणि श्रीलंकेविरुद्धच्या संपूर्ण T20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी शार्दुलला विश्रांती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारचा प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. तो स्टँडबाय म्हणून दक्षिण आफ्रिकेत गेला होता.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

रहाणे आणि पुजारा कसोटी संघाबाहेर
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. चेतन शर्माने संघाच्या घोषणेच्या वेळी सांगितले की, दोघांनाही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. ते रणजी ट्रॉफी खेळत आहेत. भारताचे दोन मोठे खेळाडू रणजीमध्ये खेळत आहेत ही चांगली गोष्ट आहे.
राहुल आणि सुंदर जखमी, बुमराह टी-20 आणि कसोटीत उपकर्णधार
दक्षिण आफ्रिकेत भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणारा सलामीवीर केएल राहुल आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांना अनफिट असल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. राहुलच्या जागी बुमराह कसोटी आणि टी-20 मालिकेत टीम इंडियाचा उपकर्णधार असेल.

Advertisement

T20 संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि आवेश खान.

Advertisement

कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत यादव ( उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.

Advertisement
Advertisement

Leave a Reply