Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: हैदराबादचा बिघडला गणित; आयपीएल पूर्वीच ‘या’ दिग्गज ने दिला मोठा धक्का

मुंबई – IPL 2022 साठी लिलाव प्रक्रिया (Mega Auction) पूर्ण झाली आहे. यावेळी मेगा ऑक्शनमध्ये सर्व संघांमध्ये अनेक खेळाडूंची अदलाबदल करण्यात आली आहे. त्याचबरोबर अपेक्षेपेक्षा जास्त पैसे खर्च करून काही खेळाडूंना त्यांच्या जुन्या संघाने आपल्या संघात कायम ठेवले आहे. डेव्हिड वॉर्नरच्या (Devid Warner) नेतृत्वाखाली 2016 मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) संघाने आगामी हंगामासाठी अनेक स्टार खेळाडूंचाही समावेश केला आहे. याशिवाय, फ्रँचायझीने पुन्हा एकदा अनेक जुन्या खेळाडूंना संघात सामील केले आहे. यामध्ये टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, अभिषेक शर्मा आणि प्रियम गर्ग यांची नावे प्रमुख आहेत.

Advertisement

याशिवाय फ्रँचायझी लिलाव प्रक्रियेदरम्यान संघाचा 35 वर्षीय माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर संघात सामील होण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हता त्यामुळे त्याला संघाने रेटेन केला नाही.

Advertisement

तर दुसरीकडे माजी सहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटिचने (Simon Katich) असा आरोप केला आहे की मेगा लिलावात पूर्वनिर्धारित योजना फ्रेंचायझीने टाळल्या आहेत. हा आरोप करत त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.

Loading...
Advertisement

कॅटिचआधी ट्रेव्हर बेलिस आणि ब्रॅड हॅडिन यांनीही गेल्या मोसमात संघ सोडला होता. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन संघाचा 56 वर्षीय माजी खेळाडू टॉम मूडी अजूनही मुख्य प्रशिक्षकपदावर कायम आहे.

Advertisement

आयपीएलचा 14वा हंगाम हैदराबादसाठी खूपच भयावह होता. संघाला साखळी सामन्यांमध्ये केवळ तीन सामने जिंकता आले, तर 11 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. याचा परिणाम असा झाला की, संघ शेवटच्या स्थानावर राहताना साखळी सामन्यांतून बाहेर पडला. यादरम्यान, SRH ने हंगामाच्या मध्यभागी वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकून केन विल्यमसनला पुढील कर्णधार म्हणून नियुक्त केले, तरीही त्याच्या नेतृत्वाखाली संघाला फारसे यश मिळाले नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply