Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी; किंग कोहलीला BCCI करणार संघातून आउट?

मुंबई – भारत आणि श्रीलंका (IND vs Sri Lanka) यांच्यात 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची T20 मालिका (T20 Series) सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच निवड करण्यात येणार आहे. टीम सिलेक्शनपूर्वी एक रिपोर्ट समोर आला आहे, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी-20 (T20 Series) मालिकेपासून दूर राहू शकतो.

Advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार कोहलीला टी-20 मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. तो कसोटी मालिकेत पुनरागमन (Comeback) करू शकतो. मोहाली येथे होणारा पहिला कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असेल. विराटने 22 नोव्हेंबर 2019 रोजी कोलकाता येथे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही.

Advertisement

त्याच बरोबर नोव्हेंबर 2021 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला रवींद्र जडेजा देखील संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर येथे शेवटचा सामना खेळला होता.

Loading...
Advertisement

मिक्सर खरेदीवरही मोठी सूट.. ऑफर पाहण्यासाठी आजच https://bit.ly/3gKdz4F यावर क्लिक करा

Advertisement

जडेजासोबत जसप्रीत बुमराहचेही पुनरागमन अपेक्षित आहे. बुमराह वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही खेळू शकला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 26 जानेवारीला सांगितले की, मोहम्मद शमी आणि जडेजासोबत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.

Advertisement

रोहित शर्मा होऊ शकतो कसोटीचा कर्णधार
संघ निवडीदरम्यान कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणाही होऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. त्याच्या माघारीनंतर कसोटी संघाच्या कर्णधाराचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. एकदिवसीय आणि टी-20 नंतर आता रोहित शर्माकडे कसोटीचे कर्णधारपद सोपवले जाईल, असे मानले जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply