मुंबई – कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आज वेस्ट इंडिजविरुद्धच्या (IND vs West Indies) दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची शेवटची तीन टी-20 मालिका जिंकली आहे. 2017 मध्ये वेस्ट इंडिजने शेवटच्या टी-20 मालिकेत भारताचा पराभव केला होता. वेस्ट इंडिजला पाच वर्षांत एकदाही टीम इंडियाला हरवता आलेले नाही.
वेस्ट इंडिज संघाला आतापर्यंत भारतीय दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. या संघाने भारताविरुद्ध सलग चार सामने गमावले आहेत, ज्यात तीन एकदिवसीय आणि एक टी-20 सामने आहेत. किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाला त्यांच्या पसंतीच्या T20 फॉर्मेटमध्ये उर्वरित सामन्यात भारतासमोर आव्हान देण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडला टी-20 मालिकेत 3-2 ने पराभूत केल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ येथे आला आहे. भारताने बुधवारी पहिल्या T20 मध्ये विंडीजचा सहा विकेट्सनी पराभव केला.
भारताने सध्याची मालिका जिंकल्यास, टीम इंडियाचा नियमित कर्णधार म्हणून नियुक्ती केल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सलग तिसरी मालिका जिंकेल. संघाची चिंता फक्त विराट कोहलीचा फॉर्म आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 08, 18, 00 आणि 17 धावा केल्या आहेत आणि संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. पहिल्या T20 मध्ये कोहलीला मोठी खेळी खेळण्याची संधी होती, मात्र तो 13 चेंडूत पॅव्हेलियनमध्ये परतला.
तर रोहितला पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजीचे महत्त्व माहित आहे आणि त्याने पहिल्या T20 मध्ये 19 चेंडूत 40 धावांची खेळी केली होती. रोहितचा सलामीचा जोडीदार ईशान किशन लयीत दिसत नसल्याने त्याला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.
158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकापाठोपाठ तीन गडी गमावूनही भारताची स्थिती कायमच सुस्थितीत होती हे त्याच्या खेळीमुळेच. आयपीएल 2022 च्या लिलावात 15.25 कोटींचा सर्वात महागडा खेळाडू असलेला ईशान मोकळेपणाने खेळू शकला नाही आणि स्ट्राइक रोटेट करण्यासाठी धडपडत होता, तर रोहित मोठ्या लयीत दिसत होता.
भारताने सुरुवातीच्या सामन्यात फॉर्मात असलेला फलंदाज श्रेयस अय्यरला सोडून अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला संधी देत सहा गोलंदाजांसह जाण्याचा निर्णय घेतला. रोहित म्हणाला की, त्याने श्रेयसला सांगितले आहे की त्याला वर्ल्डकपसाठी अष्टपैलू खेळाडूची गरज आहे.
पहिल्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार म्हणाला होता की आम्ही श्रेयसच्या बाबतीत अगदी स्पष्ट आहोत, आम्ही त्याला सांगितले आहे की विश्वचषकाची तयारी करताना संघाला गोलंदाजी करू शकणारा खेळाडू हव आहे.
जेसन होल्डर परत येऊ शकतो
दौऱ्यातील पहिला विजय शोधणाऱ्या पोलार्डच्या संघासाठी हा ‘करा किंवा मरा’ असा सामना आहे. दुखापतीमुळे पहिल्या टी-20ला मुकलेला वेगवान गोलंदाज अष्टपैलू जेसन होल्डरच्या पुनरागमनाची संघाला आशा असेल. बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात निकोलस पूरन हा संघासाठी आशेचा एकमेव किरण होता, त्याने 38 चेंडूत अर्धशतक ठोकले. सलामीवीर काइल मायर्सला मात्र चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयश आला होता.
Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
भारताची संभावित Playing-11
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर/मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल.