Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अन् अज्जू आला फॉर्मत; पहिल्याच सामन्यात BCCI ला दिला मोठा संदेश

मुंबई – गेल्या काही काळापासून आपल्या फॉर्मशी झगडत असलेला भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji trophy) दमदार सुरुवात केली आहे. भारतीय संघातून (Team India) वगळण्याच्या मार्गावर असलेल्या रहाणेने पहिल्याच सामन्यात शतक झळकावून पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. मुंबईकडून खेळताना त्याने सौराष्ट्रविरुद्ध 212 चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले.

Advertisement

मुंबईने 44 धावांवर आपले तीन विकेट गमावले तेव्हा रहाणे फलंदाजीला आला. त्यानंतर त्याने सर्फराज खानसह संघाची धुरा सांभाळली आणि चौथ्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची अखंड भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रहाणे 250 चेंडूत नाबाद 108 आणि सर्फराज 219 चेंडूत नाबाद 121 धावांवर खेळत होते.

Advertisement

भारतीय संघाला पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri lanka) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. अशा स्थितीत रहाणेच्या शतकी खेळीमुळे त्याचा आत्मविश्वास उंचावण्याबरोबरच त्याला थोडा दिलासा मिळणार आहे. याच पुन्हा एकदा कामात येऊन बीसीसीआयला संदेश त्याने दिला आहे.

Loading...
Advertisement

मिक्सर खरेदीवरही मोठी सूट.. ऑफर पाहण्यासाठी आजच https://bit.ly/3gKdz4F यावर क्लिक करा

Advertisement

रहाणेने अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आपल्या फलंदाजीने निराश केले होते आणि तो धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसला होता. त्याच्या कमकुवत कामगिरीनंतर त्याला संघातून वगळून तरुणांना संधी देण्याची मागणी होत होती. रहाणेविरुद्धच्या या सामन्यात त्याचा भारतीय सहकारी चेतेश्वर पुजारा खेळत आहे, ज्याच्यावर संघाबाहेर राहण्याची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडून अशाच काही खेळीच्या अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आणि टीम इंडियाला कायम राहतील.

Advertisement
Advertisement

Leave a Reply