मुंबई – 20 फेब्रुवारी रोजी भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs West Indies) यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्यासाठी ईडन गार्डन्सवर( Eden Gardens) BCCI ने 20, हजार प्रेक्षकांना अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यापैकी बहुतेक क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) सदस्य असतील.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे प्रमुख अविशेक दालमिया यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, तुमच्या विनंतीनंतर, इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी20 मध्ये प्रेक्षकांना परवानगी दिली जाऊ शकते.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
यासाठी CAB आपल्या सदस्यांना आणि मान्यताप्राप्त युनिट्सना मोफत तिकिटे जारी करेल. दालमिया म्हणाले की, आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत. हे CAB ला आजीवन सहयोगी, वार्षिक आणि मानद सदस्यांप्रती आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम करेल. याआधी गांगुलीने म्हटले होते की, खेळाडूंच्या आरोग्याला कोणताही धोका होऊ नये म्हणून प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.
दालमिया यांनी 70 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची विनंती केली होती. पहिल्या दोन T20 सामन्यांमध्ये, सुमारे 2000 प्रेक्षकांना कॉर्पोरेट बॉक्स आणि डॉ बी सी रॉय क्लब हाऊसच्या वरच्या स्तरावर प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यांचे मॅच पास फक्त प्रायोजकांसाठी आहेत.