Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वेस्ट इंडिजविरुद्ध ‘ही’ कामगिरी करताच T20 मध्ये भारत बनणार नंबर वन

मुंबई – बुधवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिका (T 20 Series) सुरू झाली आहे . या मालिकेत भारताला जगातील टी-20 संघ बनण्याची संधी आहे. यासाठी टीम इंडियाला तिन्ही सामने जिंकावे लागतील. याआधी एकदिवसीय मालिकेत भारताने याच कॅरेबियन संघाचा 3-0 ने पराभव केला होता, पण टी-20 मध्ये ते सोपे नसेल. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना T20 फॉरमॅट खूप आवडतो आणि सर्व खेळाडूंना आक्रमक फलंदाजी करायला आवडते.

Advertisement

अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला वेस्ट इंडिजचा संघ जगातील सर्वात धोकादायक T20 संघांपैकी एक आहे. मात्र, कॅरेबियन संघाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दोन्ही संघांमध्ये 17 टी-20 सामने झाले आहेत. यातील 10 सामने भारताने तर सहा सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका झाली आहे. या तिन्ही मालिका भारताच्या नावावर झाल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा सफाया केला आहे. जर पुन्हा एकदा भारतीय संघ वेस्ट इंडिजला 3-0 ने पराभूत करण्यात यशस्वी झाला तर तो आयसीसी क्रमवारीत जगातील नंबर वन टी-20 संघ बनेल.

Advertisement

सध्याच्या घडीला इंग्लंड हा जगातील नंबर वन टी-20 संघ आहे. इंग्लंडचे 269 रेटिंग गुण आहेत. तर भारताचे 267 रेटिंग गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, ज्याचे 266 रेटिंग गुण आहेत.

Advertisement

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज. खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि कुलदीप यादव.

Advertisement
Advertisement

Leave a Reply