Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लिलावात ‘हा’ खेळाडू गमावल्याने पंत झाला भावूक; म्हणाला सॉरी..

मुंबई – आयपीएल 2022 (IPL 2022) मेगा लिलावात (Mega Auction) आवेश खानला (Avesh Khan) लखनऊ जायंट्सने (Lucknow Giants) 10 कोटी रुपयांना विकत घेतले. आवेशची मूळ किंमत 20 लाख होती, त्याला 50 पट जास्त मिळाले. तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. आवेश खान आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळला होता आणि मागील हंगामात हर्षल पटेल (32) नंतर सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज होता. मात्र आता दिल्लीच्या संघात तो पुन्हा दिसणार नाही.

Advertisement

आवेशने एका स्पोर्ट्स वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘कोलकात्याला पोहोचल्यानंतर मी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) खोलीत गेलो आणि त्याला भेटलो, त्यानंतर पंतने मला मिठी मारली आणि म्हणाला, सॉरी घेऊ शकलो नाही. कारण त्याच्याकडे जास्त पैसे शिल्लक नव्हते आणि बाकीचे खेळाडूही विकत घ्यावे लागत होते.

Loading...
Advertisement

आवेश म्हणाला की, मी फ्लाइटमध्ये असल्याने लिलाव पाहू शकलो नाही. नंतर, जेव्हा मी लिलाव पाहिला, तेव्हा कळले की दिल्ली कॅपिटल्सने माझ्यासाठी 8.75 कोटी रुपयांची शेवटची बोली लावली होती, परंतु नंतर ती लखनऊहून 10 कोटींवर नेली. आम्ही पंतसोबत बराच वेळ घालवला आहे. अंडर-19 मध्ये आम्ही एकत्र खेळलो आहोत. सामन्यानंतर आम्ही नेहमी एकत्र बसतो.

Advertisement

10 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा नव्हती
आवेशने सांगितले की, त्याला 10 कोटी रुपयांना विकण्याची अपेक्षा नव्हती. त्यांना 7 कोटींपर्यंत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र लिलावादरम्यान त्याला विकत घेण्यासाठी संघांमधील स्पर्धा पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply