Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारताच्या उपकर्णधारबद्दल BCCI ने घेतला मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूला मिळाली जबाबदारी

मुंबई- बुधवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या (IND vs West Indies) तीन सामन्यांच्या मालिकेतून उपकर्णधार केल राहुल (K.L.Rahul) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) बाहेर झाले आहे.केएल राहुल दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला असताना संघाचा उपकर्णधार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

Advertisement

पण भारतीय संघाने तिन्ही सामने उपकर्णधाराशिवाय खेळले आणि आता आज जेव्हा वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याची बातमी आली तेव्हा राष्ट्रीय निवड समितीनेही उपकर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

जिथे वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) जागी निवडकर्त्यांनी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघात स्थान दिले आहे, तिथे आता भारतीय टी-20 संघालाही नवा उपकर्णधार मिळाला आहे. आणि या निर्णयाने बीसीसीआयने (BCCI) भविष्यातील रोडमॅपचे संकेतही दिले आहेत. जखमी केएल राहुलच्या जागी विंडीजविरुद्ध आता यष्टिरक्षक ऋषभ पंत (Rishab pant) उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे.

Advertisement

टी 20 मालिकेसाठी भारतीय टी20 संघ

Advertisement

रोहित शर्मा (कप्तान), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर, उप-कप्तान), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शारदूल ठाकुर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटे, ऋतुराज गायकवाड़, दीपक हूडा और कुलदीप यादव.

Advertisement
Advertisement

Leave a Reply