Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडियाला धक्का! लिलावामध्ये पाचपट रक्कम घेणारा ‘हा’ ऑलराउंडर विंडीजविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

मुंबई- भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs West Indies) यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) पुन्हा दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झालात आहे. सुंदर हा T20 मालिकेतून (T20 Series) बाहेर होणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी संघाचे उपकर्णधार केएल राहुल आणि अक्षर पटेल हे देखील दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेले आहेत.

Advertisement

बीसीसीआयच्या (BCCI) वतीने एक निवेदन जारी करण्यात आले असून दुखापतीमुळे सुंदरच्या बाहेर पडल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला डाव्या हाताच्या पट्टीत दुखापत झाल्याने तो Paytm T20 मालिकेतून बाहेर झाला आहे.

Advertisement

निवेदनात पुढे म्हटले आहे की, वॉशिंग्टनच्या दुखापतीनंतर त्याच्या जागी कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Loading...
Advertisement

विशेष म्हणजे, 22 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने दुखापतीतून सावरल्यानंतर दीर्घ कालावधीनंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत नुकतेच पुनरागमन केले. त्याने या मालिकेत
चमकदार कामगिरी केली होती. सुंदरला शनिवारी आयपीएल मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने तब्बल 8.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

Advertisement

भारतीय टी20 संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज. खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव.

Advertisement
Advertisement

Leave a Reply