Take a fresh look at your lifestyle.

‘या’ खेळाडूने IPLमध्ये घेतला नाही एकही विकेट तरीही लीलावामध्ये झाला मालामाल, जाणुन घ्या त्या बद्दल

मुंबई – आयपीएल (IPL) लिलाव 2022 (Mega Auction) पूर्ण झाला आहे. यामध्ये 600 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. मात्र केवळ 204 खेळाडूंनाच खरेदी करण्यात आले. या खेळाडूंवर संघांनी 551 कोटी रुपये खर्च केले आहेत. या लिलावात भारतासोबतच इतर देशांचे खेळाडूही सहभागी झाले होते. त्यात श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगाही (Vanindu Hasaranga) सहभागी झाला होता. वानिंदू सध्या आयसीसी (ICC) क्रमवारीत टी-20 फॉरमॅटमध्ये नंबर वन गोलंदाज आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) लिलावात 10.75 कोटींना विकत घेतले.

Advertisement

जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या वानिंदूने आयपीएलच्या शेवटच्या हंगामात पदार्पण केले होते. मात्र, त्याला अधिक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळू शकली नाही. तो आतापर्यंत फक्त 2 आयपीएल सामने खेळू शकला आहे. यादरम्यान वनिंदूला एकही विकेट मिळाली नाही. तर त्याने फक्त एक धाव काढली आहे. पण असे असूनही, त्याने आयपीएल लिलावात 1 कोटी रुपयांची मूळ किंमत आणली आणि 10.75 कोटींना विकत घेतले. त्याला आरसीबीने मूळ किमतीपेक्षा 11 पटीने जास्त पैसे देऊन खरेदी केले.

Advertisement

श्रीलंकेच्या या खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तो प्रभावी ठरला आहे. वानिंदू हसरंगाने आतापर्यंत 35 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 57 विकेट घेतल्या आहेत. तर 29 वनडेत 29 बळी घेतले आहेत. तो 4 कसोटी सामनेही खेळला आहे.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

वानिंदू हसरंगाशी संबंधित एक मनोरंजक गोष्ट म्हणजे तो एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक घेणार्‍या मोजक्या गोलंदाजांपैकी एक आहे. हसरंगाने जुलै 2017 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि झिम्बाब्वेविरुद्ध हॅट्ट्रिक घेऊन इतिहास रचला. विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला लेगस्पिनर ठरला आहे. त्यानंतर 2021 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने हॅटट्रिक घेतली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply