Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मेगा लिलाव पाहून इंग्लंडचा ‘हा’ माजी कर्णधार झाला नाराज,म्हणाला स्टार क्रिकेटर…

मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामातील खेळाडूंची लिलाव प्रक्रिया (Mega Auction) बेंगळुरूमध्ये सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या लिलावादरम्यान अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे, तर काही खेळाडूंची निराशा झाली आहे. या खेळाडूंमध्ये एक मोठे नाव आहे 33 वर्षीय अनुभवी फिरकी गोलंदाज आदिल रशीद (Adil Rashid) आयपीएल लिलावात यावेळीही राशिदला निराशा आली आहे.

Advertisement

वास्तविक रशीद यावेळी दोन कोटींची मूळ किंमत घेऊन मैदानात उतरला होता, पण कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यात रस दाखवला नाही. माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉननेही (Michael Vaughan) या अनुभवी खेळाडूच्या न विकल्या गेल्याने ट्विट करून आपली निराशा व्यक्त केली आहे. वॉनने ट्विट करून लिहिले, ‘आदिल रशीदला मोठी बोली का लागली नाही हे समजत नाही!!! सर्वोत्तम T20 गेम चेंजर्सपैकी एक अद्याप निवडला गेला नाही.

Advertisement

रशीद सध्या जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने इंग्लंडकडून 73 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळताना 70 डावांमध्ये 22.7 च्या सरासरीने 81 बळी घेतले आहेत. रशीदच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनदा चार विकेट घेण्याचा पराक्रम आहे. इंग्लिश फिरकीपटूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी म्हणजे दोन धावांत चार बळी.

Loading...
Advertisement

खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा

Advertisement

याशिवाय तो आयपीएलमध्ये एक सामनाही खेळला आहे. यादरम्यान त्याने 18 धावा दिले होते मात्र त्याला विकेट मिळाला नाही. त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याला अद्याप आयपीएलमध्ये फलंदाजीची संधी मिळालेली नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply