मुंबई – पाकिस्तानचा (Pakistan) माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) पाठीच्या सततच्या समस्यांमुळे त्याची पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) करियर संपला आहे. ज्यामुळे आता त्याला सात वर्षे या स्पर्धेपासून दूर राहावे लागले. आफ्रिदीने पीएसएलच्या या मोसमात केवळ क्रीडाप्रेमींसाठी भाग घेतल्याचे सांगितले होते.
आफ्रिदीने सोशल मीडियावर (Social media) दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, मला ही स्पर्धा चांगली संपवायची होती. गेल्या 15-16 वर्षांपासून मला पाठीचा त्रास आहे आणि मी तसाच खेळत होतो. पण आता ते इतके वाढले आहे की त्याचा माझ्या मांडीवर, गुडघ्यावर परिणाम होत आहे आणि हे दुखणे माझ्या पायापर्यंत पोहोचत आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
आफ्रिदीने मात्र आगामी काळात एक लीग आणि इतर टी 10 लीगमध्ये (T10 league) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि म्हणाला, मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला पण आता मला वेदना सहन होत नाहीत. असं म्हणतात की तुमची तब्येत चांगली असली की तुम्हाला बरे वाटते. माझ्या फिटनेससाठी मी रिहॅबिलिटेशन करेन. पुढे खूप क्रिकेट बाकी आहे. क्रीडाप्रेमींसमोर मी पुन्हा पुनरागमन करू, अशी आशा आहे.