Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. मुंबईने आर्चरवर लावला मोठा दाव मात्र जोफ्राने मुंबईला दिला धक्का, जाणून घ्या कारण?

मुंबई – IPL 2022 च्या मेगा लिलावात (Mega Auction) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर (jofra Archer) मोठा दाव लावला आहे. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने जखमी आणि अनफिट जोफ्राला भरघोस रक्कम देऊन आपल्या संघात सामील करून घेतले. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबईने आर्चरला त्याच्या मूळ किमतीच्या 2 कोटींऐवजी चारपट जास्त म्हणजे 8 कोटी रुपयांना खरेदी केले.

Advertisement

आर्चर आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नसून त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी तीन संघांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्सने प्रथम बोली लावली पण त्यानंतर मुंबई आणि हैदराबादनेही यात उडी घेतली. मात्र, अखेरीस मुंबई संघाने आठ कोटी खर्च करून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.

Advertisement

आर्चर 2018 ते 2021 पर्यंत राजस्थान रॉयल्सचा भाग होता आणि संघाचा मुख्य गोलंदाज होता. त्यानंतर त्याला 7.20 कोटींना खरेदी करण्यात आले. मात्र यावेळी लिलावापूर्वी त्याला राजस्थानने सोडले.

Loading...
Advertisement

26 वर्षीय वेगवान गोलंदाज आर्चरने आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी लिलावासाठी आपले नाव दिले नव्हते. 1 हजार 214 खेळाडूंच्या पहिल्या यादीत आर्चरचे नाव नव्हते. सुरुवातीला त्याने लिलावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता पण नंतर यू-टर्न घेत आपले नाव दुसऱ्या यादीत टाकले.

Advertisement

आर्चर प्रकरणावर बीसीसीआय काय म्हणाले?
आर्चरला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणे कठीण असल्याचे बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझींना सांगितले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट (ECB) ने बीसीसीआयला 2023 आणि 2024 च्या हंगामात खेळणार असल्याची माहिती दिल्यामुळे त्याचे नाव लिलावात जोडले गेले आहे. बीसीसीआयने फ्रँचायझींना 44 नवीन खेळाडूंची यादी देताना लिहिले, “2023 आणि 2024 मध्ये संभाव्य सहभाग लक्षात घेऊन ईसीबीने आर्चरचे नाव पाठवले आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल 2022 मध्ये सहभागी होण्याची शक्यता नाही.”

Advertisement
Advertisement

Leave a Reply