मुंबई – सध्या सुरू असलेल्या IPL मेगा लिलावामध्ये (Mega Auction) 30 वर्षीय भारतीय अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला त्याची नवी टीम मिळाली आहे. आयपीएलच्या 15व्या सीझनमध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सकडून (Lucknow super Giants) खेळताना दिसणार आहे. यासोबतच कृणाल पांड्या (Kunal Pandya) आणि दीपक हुडा (Deepak Hooda) पुन्हा एकदा एका टीमसाठी एकत्र खेळताना दिसणार आहेत.
कृणाल आणि दीपक हुड्डा यांच्यातील वादानंतर हुड्डा यांनी अलीकडेच बडोदा क्रिकेट असोसिएशन सोडले आहे. हुड्डा याने आपल्यासोबत पांड्याने गैरवर्तन केल्याचा दावा केला होता.
हुड्डाला नुकतीच भारतीय संघाकडून वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून त्याने देशासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यातील त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहता त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही खेळण्याची संधी मिळाली होती. हुड्डा आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी झाला आहे.
Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
हुडाच्या आयपीएल कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने देशातील या प्रतिष्ठित स्पर्धेत अनेक संघांसाठी 80 सामने खेळताना 61 डावांमध्ये 16.7 च्या सरासरीने 785 धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजी करताना त्याने त्याच सामन्यातील 28 डावांत 9 विकेट मिळाले आहे.
कृणाल पांड्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, अनुभवी अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये 84 सामने खेळताना 72 डावांमध्ये 22.9 च्या सरासरीने 1143 धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याने इतक्याच सामन्यांच्या 81 डावांत 51 विकेट मिळवले आहे.
लखनऊच्या टीमने दीपक हुडाला 5.75 कोटींना आणि कृणाल पांड्याला 8.25 कोटींना खरेदी करून आगामी हंगामासाठी आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले आहे.