Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs WI 3rd ODI: विराट कोहली करू शकतो अॅलन बॉर्डरचा हा मोठा विक्रम आपल्या नावावर, फक्त इतक्या धावाची गरज

मुंबई – भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) हा सामना खूप खास असणार आहे. या सामन्यात तो मोठा विक्रम करू शकतो.

Advertisement

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये किंग कोहली अॅलन बॉर्डरचा मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. वास्तविक, कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनण्याची संधी आहे.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

वेस्ट इंडिजविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

Loading...
Advertisement

जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 66 सामने – 4120 धावा
अॅलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया) – 92 सामने – 3598 धावा
विराट कोहली – 67 सामने – 3584 धावा

Advertisement

भारताने दुसऱ्या वनडेत विंडीजचा 44 धावांनी पराभव

Advertisement

भारताने दुसरी वनडे 44 धावांनी जिंकली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेतील भारताचा हा विक्रमी 11वा मालिका विजय होता. यासह, टीम इंडिया वनडे क्रिकेटच्या इतिहासात एकाच संघाविरुद्ध संयुक्तपणे सर्वाधिक द्विपक्षीय मालिका जिंकणारा संघ बनला आहे. पाकिस्तानने 1996 ते 2021 दरम्यान श्रीलंकेविरुद्ध सलग 11 एकदिवसीय मालिका जिंकली होती.

Advertisement
Advertisement

Leave a Reply