Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अनकॅप्ड खेळाडूंसाठी सुनील गावसकरांनी केली नवीन नियमांची मागणी, जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022)15 व्या हंगामापूर्वी या महिन्याच्या 12 आणि 13 तारखेला खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण होईल. आगामी लिलाव प्रक्रियेसाठी एकूण 590 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 228 कॅप्ड, 355 अनकॅप्ड आणि 07 सहयोगी देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.

Advertisement

आगामी लिलाव प्रक्रियेत, नुकतेच आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करणाऱ्या भारतीय अंडर-19 संघातील अनेक खेळाडूही भाग घेत आहेत. अशा परिस्थितीत अंडर-19 विश्वचषकात चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंवर पैशांचा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

मेगा लिलावापूर्वी देशाचे माजी कर्णधार आणि सध्या समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञ सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी आयपीएल संघांना तरुण खेळाडूंबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. किंबहुना, आयपीएलमध्ये तरुण खेळाडू काही मिनिटांत करोडपती बनतात, त्यामुळे त्यांच्या खेळावर परिणाम होतो, असे त्यांचे मत आहे.

Advertisement

अलीकडे युवा खेळाडूंनी आपला चांगला खेळ दाखवला असला तरी त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असे मत माजी कर्णधाराने व्यक्त केले. अशा परिस्थितीत खेळाडूंवर अचानक पैशांचा मुसळधार पाऊस पडल्याने त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. गेल्या काही वर्षांत काही खेळाडू अशा स्थितीत दिसले आहेत.

Loading...
Advertisement

इतकेच नाही तर भारताच्या माजी कर्णधाराने युवा खेळाडूंसाठी नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे. आयपीएलमधील युवा खेळाडूंवर एक कोटी रुपयांपर्यंतची मर्यादा घातली जावी, जेणेकरून भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी ते उत्सुक असावेत आणि पुढे जावे, असे त्यांचे मत आहे.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

सहज पैसे मिळाल्यास युवा खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ शकते, असे सुनील गावस्कर यांचे मत आहे. अशा स्थितीत क्रीडा प्रशासकांनी असे नियम केले पाहिजेत की ते वर्षानुवर्षे चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील असेही गावस्कर म्हणाला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply