मुंबई – वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (West Indies vs England) इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. अॅशेस मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 8 मोठे खेळाडू संघातून बाहेर पडले आहेत. बर्न्स, अँडरसन, ब्रॉड, बेस, बटलर, बिलिंग्ज, हमीद, मालन यांना संघातून वगळण्यात आले आहे.
त्याचबरोबर चार नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. मॅथ्यू पार्किन्सन, अॅलेक्स लीस, मॅथ्यू फिशर, साकिब महमूद यांची संघात निवड झाली आहे. इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
सर अँड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड पुरुष क्रिकेटचे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक), अंतरिम मुख्य प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड आणि हेड स्काउट जेम्स टेलर यांचा समावेश असलेल्या इंग्लंडच्या पुरुष निवड समितीने पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज मालिकेसाठी तीन सामन्यांचा 16 सदस्यीय संघ जाहीर केले आहे.
तसे पाहता, ऍशेसमधील खराब कामगिरीनंतर रूटला कर्णधारपद गमवावे लागू शकते अशी अटकळ बांधली जात होती. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो कर्णधार राहील, नुकत्याच झालेल्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 4-0 असा पराभव केला.
इंग्लंड संघ पुढीलप्रमाणे
जो रूट (क), जोनाथन बेअरस्टो, झॅक क्रॉली, मॅथ्यू फिशर, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, अॅलेक्स लीस, साकिब महमूद, क्रेग ओव्हरटन, मॅथ्यू पार्किन्सन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 1 मार्चपासून कूलिज क्रिकेट ग्राउंड, अँटिग्वा येथे खेळवला जाणार आहे. मालिकेतील दुसरी कसोटी 16 मार्चपासून केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळवली जाणार आहे. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 24 मार्चपासून सेंट जॉर्ज, ग्रेनाडा येथील नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.