Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

श्रीशांतला लागली लॉटरी, रणजीसाठी ‘या’ संघाने केली निवड

मुंबई – श्रीशांतसाठी (S. Sreesanth) क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे दरवाजे उघडू लागले आहेत. केरळच्या 20 जणांच्या रणजी संघात श्रीशांतचा समावेश करण्यात आला आहे. रणजी ट्रॉफीच्या या मोसमात केरळच्या संघाचे नेतृत्व सचिन बेबीकडे असणार आहे.

Advertisement

त्याचबरोबर संजू सॅमसन सध्या तंदुरुस्त नसल्याने त्याला संघात स्थान मिळालेले नाही. सॅमसन नंतर संघात सामील होऊ शकतो. केरळ क्रिकेट असोसिएशनने सांगितले की, सध्या एनसीएमध्ये पुनर्वसन करत असलेल्या संजूला तंदुरुस्त सिद्ध झाल्यानंतर संघात समाविष्ट केले जाईल.

Advertisement

खरेदीचा आनंद आणि हमखास बचत म्हणजे आपला खरेदिवाला Kharediwala ..!

Loading...
Advertisement

रणजी करंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या केरळ संघात आनंद कृष्णन, फानोस एफ, वरुण नयनर आणि एडन ऍपल टॉम या चार नवोदित खेळाडूंचा समावेश आहे. सलामीवीर मोहम्मद अझरुद्दीनला संघात स्थान मिळाले नाही. एलिट-ए डिव्हिजनचा एक भाग असलेला केरळ 17 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान राजकोटमध्ये खेळेल. केरळच्या रणजी मोहिमेला 17 फेब्रुवारीपासून मेघालयविरुद्ध सुरुवात होणार आहे. श्रीसंतने देखील आयपीएल लिलावासाठी स्वतःची नोंदणी केली आहे. या वेगवान गोलंदाजाने शेवटची आयपीएल 2013 मध्ये खेळली होती.

Advertisement

रणजी करंडकातील केरळचे सामने
वि मेघालय – फेब्रुवारी 17-20
विरुद्ध गुजरात – 24-27 फेब्रुवारी
विरुद्ध मध्य प्रदेश – मार्च 3-6

Advertisement

केरळ संघ
केरळ संघ: सचिन बेबी (क), विष्णू विनोद (व.), आनंद कृष्णन, रोहन कुनुमेल, वत्सल गोविंद, राहुल पी, सलमान निझार, जलज सक्सेना, सिजोमन जोसेफ, अक्षय केसी, मिथुन एस, बेसिल एनपी, डीएमडी, मनू कृष्णन , बेसिल थंपी, फानोस एफ, श्रीशांत, वरुण नयनर, विनूप मनोहरन, एडन ऍपल टॉम

Advertisement
Advertisement

Leave a Reply