Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs WI: अर्र..दुसऱ्या वनडेत पुन्हा इशान किशन बसणार बाहेर, ‘हा’ खेळाडू करणार कमबॅक

मुंबई – अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना 6 विकेटने जिंकला होता. भारतीय संघासाठी या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन (Ishan Kishan) सलामीला आले. शिखर धवनला कोरोनाची लागण झाल्यामुळे ईशानला संधी देण्यात आली होती. मात्र आता रोहित आणि ईशानची जोडी कदाचित पुढच्या सामन्यात ओपनिंगसाठी दिसणार नाही.

Advertisement

अहमदाबाद वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित आणि ईशान या जोडीने चांगली भागीदारी केली होती. मात्र, यानंतर ईशान वैयक्तिक 28 धावांवर बाद झाला. तर रोहितने 60 धावा केल्या. या मॅचमध्ये धवन रोहितसोबत दिसणार होता. मात्र कोविड पॉझिटिव्ह असल्याने तो खेळू शकला नाही. मात्र, आता केएल राहुल पुढच्या सामन्यात पुनरागमन करेल. अशा स्थितीत ईशानला बाहेर बसावा लागणार आहे.

Advertisement

ब्लेंडरदायी व्हा.. आरोग्यदायी राहा.. आपल्या प्रेमळ व्यक्तीला भेट पाठवण्यासाठी https://bit.ly/3GAOOCa यावर क्लिक करा

Loading...
Advertisement

केएल राहुल (K.L. Rahul) हा टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने भारतासाठी अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सलामीवीर म्हणून त्याची कामगिरी पाहिली तर तो प्रभावीही ठरला आहे. त्यामुळे ओपनिंगसाठी कर्णधार रोहित केएलला सोबत घेऊन येण्याची शक्यता आहे. राहुल पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. ते एका लग्नाला गेले होते.

Advertisement

वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 43.5 षटकांत सर्वबाद 176 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 28 षटकांत 4 गडी गमावून सामना जिंकला. यामध्ये रोहित आणि ईशानसह सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांनीही चांगली कामगिरी केली. सूर्यकुमारने नाबाद 34 आणि दीपकने नाबाद 26 धावा केल्या.

Advertisement
Advertisement

Leave a Reply