मुंबई – हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली अहमदाबादचा संघ ‘अहमदाबाद टायटन्स‘ (Ahmedabad Titans) म्हणून ओळखला जाईल. वृत्तानुसार, अहमदाबाद फ्रँचायझीने त्याचे नाव निवडले आहे, परंतु त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. हार्दिक व्यतिरिक्त, अहमदाबाद फ्रँचायझीने अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान (Rashid Khan) आणि भारतीय सलामीवीर शुभमन गिल यांना देखील सामील केले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये आठऐवजी एकूण 10 संघ खेळणार आहेत. बीसीसीआयने गेल्या वर्षी 25 ऑक्टोबरला आयपीएलसाठी दोन नवीन संघांची घोषणा केली होती. लखनौला RPSG व्हेंचर्स लिमिटेडने 7090 कोटी रुपयांना आणि अहमदाबादला CVC कॅपिटलने 5625 कोटी रुपयांना विकत घेतले. लखनऊने गेल्या महिन्यातच त्याचे अधिकृत नाव जाहीर केले होते.
तर दुसरीकडे लखनौचा संघ ‘लखनऊ सुपर जायंट्स’ म्हणून ओळखला जाईल. लखनौ फ्रँचायझीचे मालक RPSG व्हेंचर्स लिमिटेड (गोएंका ग्रुप) चे अध्यक्ष डॉ. संजीव गोयंका यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या नावाची घोषणा केली. लखनौ फ्रँचायझीने केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. फ्रँचायझीने त्याला 17 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.
ब्लेंडरदायी व्हा.. आरोग्यदायी राहा.. आपल्या प्रेमळ व्यक्तीला भेट पाठवण्यासाठी https://bit.ly/3GAOOCa यावर क्लिक करा
तर स्टॉइनिसला 9.2 कोटी रुपयांना आणि भारताचा लेगस्पिनर रवी बिश्नोईला 4 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. त्याचवेळी अहमदाबादने हार्दिक आणि रशीदला प्रत्येकी 15 कोटी आणि शुभमन गिलला 8 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.