Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एक हजाराव्या सामन्यात टीम इंडियासमोर आहेत ‘ही’ आव्हाने; वेस्ट इंडिजला रोखणार का..?

मुंबई : नवीन कर्णधार रोहित शर्माच्या उपस्थितीत भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय संघासाठी ऐतिहासिक 1000 वा एकदिवसीय सामना असेल. भारतीय संघ 2023 च्या विश्वकप स्पर्धेसाठी तयारी आतापासूनच सुरू करू इच्छितो, ज्यामध्ये ते 2015 आणि 2019 मध्ये ट्रॉफी जिंकू शकले नाहीत आणि आता त्यांना खरोखर त्यांची रणनितीमध्ये काही महत्वाचे बदल करावेसे वाटत आहेत.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेच्या कमकुवत संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, भारतीय संघ आता नवीन कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविडसह वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेत विजयी होण्याचा प्रयत्न करील. ‘रोहित-द्रविड’ जोडी पुढील काही महिन्यांत 50 ओव्हरच्या फॉरमॅटसाठी भारतीय संघाची रणनिती ठरवतील. कारण, हे स्पष्ट झाले आहे की सुधारण्यासाठी थोडे कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे रविवारपासून सुरू होणारी ही मालिका संघर्ष करत असलेल्या मधल्या फळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य असेल.

Advertisement

सर्व प्रथम कर्णधार रोहितला नेतृत्व करावे लागेल, जो एक उत्तम फलंदाज आहे. पहिल्या सामन्यात के. एल. राहुलची गैरहजेरी आणि इतर काही आघाडीचे फलंदाज कोरोना संक्रमित आढळल्यानंतर आता इशान किशन रोहितसह फलंदाजीस सुरुवात करेल. मालिकेच्या सुरुवातीस रोहित म्हणाला, की आमच्याकडे इशान किशन हा एकमेव पर्याय आहे आणि तो माझ्याबरोबर संघाच्या फलंदाजीस सुरुवात करणार आहे.

Loading...
Advertisement

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंत वगळता तिन्ही सामन्यांमध्ये मधली फळी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. आणि आता मधल्या फळीत प्रभावी खेळाडूंची गरज आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यर उपलब्ध नसल्याने आक्रमक सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांना चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. या दोघांव्यतिरिक्त संघातील महत्वाचा फलंदाज विराट कोहली कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

आता टी 20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजने केलीय संघाची घोषणा.. पहा, कसा आहे वेस्ट इंडिजचा संघ

Advertisement
Advertisement

Leave a Reply