मुंबई – पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी 2021 मध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता आणि गेल्या आठवड्यात त्याला आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून घोषित केले. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सुपर 12 सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारतावर 10 गडी राखून विजयासह T20 विश्वचषकातील पाकिस्तानच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये त्याची महत्वाची भूमिका होती. 21 वर्षीय गोलंदाजाने शनिवारी आपल्या “ड्रीम हॅट्ट्रिक” मध्ये कोणाचा नाव असणार आहे या बाबत त्याने खुलासा केला आहे. ज्यामध्ये सध्याच्या भारतीय संघाचे तीन दिग्गज – रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली आहेत.
भारताच्या या तीन खेळाडूंना बाद करून ड्रीम हॅट्ट्रिक करायची आहे, असे त्याने सांगितले. यादरम्यान, त्याला विचारण्यात आले की कोणाची विकेट तुमच्यासाठी सर्वात जास्त मूल्यवान आहे, म्हणून त्याने विराट कोहलीचे नाव घेतले.
गेल्या टी-20 विश्वचषकात शाहीन आफ्रिदीने केवळ या तिघांच्याच विकेट्स घेतल्या होत्या परंतु हॅट्ट्रिकच्या रूपात नाही. रोहित आणि राहुलला त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये बाद केल्यानंतर, शाहीनने त्याच्या दुसऱ्या स्पेलच्या शेवटच्या षटकात तत्कालीन भारतीय कर्णधार कोहलीला बाद केले होते. जी त्याच्या मते आतापर्यंतची सर्वात मौल्यवान विकेट आहे. त्याच्या 31 धावांत तीन विकेट्सच्या आकड्याने भारताला पाकिस्तानच्या एकूण 7 बाद 151 धावांवर रोखले.
कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी नाबाद अर्धशतके झळकावल्यामुळे पाकिस्तानने धावसंख्येचा सहज पाठलाग केला. आयसीसीने या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. मागील आवृत्तीप्रमाणे, भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे स्पर्धेतील त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात आमनेसामने होतील.