Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ठरलं तर..! आता ‘या’ दिवसापासून सुरू होणार रणजी ट्रॉफी.. पहा, काय आहे क्रिकेट मंडळाचे नियोजन

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रणजी ट्रॉफी 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. गतवर्षी कोरोना संकटामुळे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते आणि यावेळी 13 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू करण्याचे नियोजन होते, परंतु देशातील तिसरी लाट पाहता स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रणजी ट्रॉफी 2022 कधी सुरू होणार, या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. बोर्ड प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआय ही स्पर्धा 13 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा विचार करत आहे. या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

गांगुलीने स्पोर्ट्स स्टारला याबाबत माहिती दिली. सर्व संघांची 5 गटात विभागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गटात 6 संघ असतील. तर प्लेट ग्रुपमध्ये 8 संघ असतील. गांगुली म्हणाला, की ‘आम्ही फेब्रुवारीच्या मध्यापासून रणजी ट्रॉफी सुरू करण्याचा विचार करत आहोत. ही तारीख 13 फेब्रुवारी असू शकते. सध्या तरी रणजी ट्रॉफीचा फॉरमॅट तसाच राहणार आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा एक महिन्याचा असेल जो आयपीएल 2022 आधी आयोजित केला जाईल.

Advertisement

रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात लीग स्तरीय सामने होतील आणि बाद फेरीचे सामने जूनमध्ये होतील. ते म्हणाले, की ‘आयपीएल 2022 क्रिकेट स्पर्धा 27 मार्चपासून होणार आहे आणि अशा परिस्थितीत जून आणि जुलैमध्ये रणजी ट्रॉफीचे बाद फेरीचे सामने आयोजित केले जातील. फॉरमॅटमध्ये कोणताही बदल होणार नाही. कोरोनाच्या बाबतीत, आम्ही स्पर्धेसाठी ठिकाण शोधत आहोत. आम्ही सध्या सर्व गोष्टींचा विचार करत आहोत.

Loading...
Advertisement

रणजी ट्रॉफीबद्दल रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुर्लक्ष झाल्यास….

Advertisement

भारतीय खेळाडूंसाठी खुशखबर..! आयपीएलआधी होणार ‘ही’ सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा.. पहा, काय निर्णय होऊ शकतो..?

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply