Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले खुश, जाणुन घ्या तो निर्णय..

मुंबई – बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी शुक्रवारी सांगितले की पुढे ढकलण्यात आलेली रणजी ट्रॉफी (Ranji trophy) पुढील महिन्यापासून दोन टप्प्यात खेळवली जाणार आहे. गतवर्षी कोरोना महामारीमुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते.(Big decision taken by BCCI, fans are happy, know that decision ..)

Advertisement

38 संघांची ही स्पर्धा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असून पहिला टप्पा महिनाभर चालणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी 13 जानेवारीपासून हे आयोजन करण्यात येणार होते, मात्र कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमुळे ते पुढे ढकलण्यात आले.

Advertisement

शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बोर्डाने रणजी ट्रॉफी दोन टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात लीग स्तरीय सामने होतील आणि जूनमध्ये बाद सामने खेळवले जातील.

Loading...
Advertisement

पुढे ते म्हणाले की “रणजी ट्रॉफी ही आमची सर्वात प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा आहे, जी दरवर्षी अनेक प्रतिभावान खेळाडूंना भारतीय क्रिकेटमध्ये आणते. या प्रमुख स्पर्धेचे हित जपण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

Advertisement

याच्या एक दिवस आधी मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले होते की, मंडळाला यंदा ही स्पर्धा आयोजित करायची आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) देखील 27 मार्चपासून सुरू होत आहे, ज्यामुळे रणजी ट्रॉफी दोन टप्प्यात आयोजित केली जाणार आहे. रणजी ट्रॉफी बद्दल बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाला आहे. (Big decision taken by BCCI, fans are happy, know that decision ..)

Advertisement
Advertisement

Leave a Reply