Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रणजी ट्रॉफीबद्दल रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुर्लक्ष झाल्यास….

मुंबई – भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी शुक्रवारी सांगितले की रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष झाल्यास भारतीय क्रिकेट ‘बॅकलेस’ होईल. बीसीसीआयने पुढील महिन्यापासून दोन टप्प्यात रणजी करंडक स्पर्धा आयोजित करण्याच्या घोषणेच्या काही वेळापूर्वीच शास्त्री यांनी हे विधान केले आहे. रणजी करंडक 13 जानेवारीपासून खेळवला जाणार होता मात्र कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

Advertisement

शास्त्री यांनी ट्विट केले की रणजी ट्रॉफी हा भारतीय क्रिकेटचा कणा आहे. याकडे दुर्लक्ष केल्याने तुमचा मणकाही कमी होईल. शास्त्रींच्या ट्विटनंतर एका तासाच्या आत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात स्पर्धेच्या दोन टप्प्यातील कार्यक्रमाची पुष्टी केली. शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बोर्डाने रणजी ट्रॉफी दोन टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. साखळी स्तरावरील सामने पहिल्या टप्प्यात होणार असून जूनमध्ये बाद फेरीचे सामने खेळवले जातील.

Loading...
Advertisement

38 संघांची ही स्पर्धा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार असून महिनाभर चालणार असल्याचे समजते. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी गुरुवारी बोर्डाच्या बैठकीनंतर सांगितले होते की, बोर्ड रणजी ट्रॉफी दोन टप्प्यात आयोजित करू शकते. याचे कारण म्हणजे 27 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे आणि अशा परिस्थितीत रणजी ट्रॉफी एकाच वेळी होणे शक्य नाही.

Advertisement

या बैठकीत बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह उपस्थित होते. रणजी ट्रॉफीचे पहिले सत्र फेब्रुवारी ते मार्च आणि दुसरे सत्र जून-जुलैमध्ये आयोजित करण्याची बोर्डाची योजना आहे. मागील हंगामात महामारीमुळे, बीसीसीआय पुरुषांच्या मर्यादित षटकांच्या फक्त दोन स्पर्धा (विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी) आयोजित करू शकले होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply