Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Legends League मध्ये दिसला पठाण पावर, चक्क 18 चेंडूमध्येच मोडला ताहिरचा ‘तो’विक्रम

मुंबई – लेजंड लीग क्रिकेटमधील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाला वर्ल्ड जायंट्स संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारतीय संघाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी 29 जानेवारी रोजी वर्ल्ड जायंट्स आणि आशिया लायन्स यांच्यात होणार आहे. करा किंवा मरा या सामन्यात इंडियन महाराजा संघाचा पाच धावांनी पराभव झाला. या सामन्यात भारताच्या इरफान पठाणने (Irfan Pathan) या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले, मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Advertisement

ब्रेट लीने सामन्याच्या शेवटच्या षटकात फक्त दोन धावा दिले. यासह भारताच्या महाराजांचा सामना पाच धावांनी गमवाला आणि अंतिम फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशाही संपुष्टात आले

Advertisement

मस्कत, ओमान येथील अल एमिरेट्स क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, इंडियन महाराजांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चांगली सुरुवात केली. दुसऱ्याच षटकात केविन पीटरसन 5 चेंडूत 11 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, त्यानंतर हर्शल गिब्सने दोन उत्कृष्ट भागीदारी करत वर्ल्ड जायंट्सची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. त्याने प्रथम फिल मस्टर्डसोबत 98 आणि नंतर केविन ओब्रायनसोबत 71 धावांची भागीदारी केली. गिब्सने 46 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. तर फिल मस्टर्डने 33 चेंडूत 57 धावा आणि केविन ओब्रायनने 14 चेंडूत 34 धावा केल्या.

Loading...
Advertisement

अखेरच्या षटकात अॅल्बी मॉर्केलने दमदार फलंदाजी करत नऊ चेंडूत 16 धावा आणि जॉन्टी ऱ्होड्सने 20 धावा केल्याने वर्ल्ड जायंट्सला पाच गडी गमावून 228 धावांपर्यंत मजल मारता आली. इंडियन महाराजांकडून मुनाफ पटेलने सर्वाधिक दोन बळी घेतले. तर इरफान पठाण, रजत भाटिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Advertisement

पठाण आणि ओझा यांची झंझावाती खेळी व्यर्थ
229 धावांचा पाठलाग करताना इंडियन महाराजांची सुरुवात खराब झाली. वसीम जाफर चार आणि एस बद्रीनाथने दोन धावा करून बाद झाला. यानंतर नमन ओझा आणि युसूफ पठाण यांनी 103 धावांची भागीदारी केली, मात्र युसूफ पठाण 22 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. यानंतर नमन ओझाही 51 चेंडूत 95 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर इरफान पठाणने या मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावून इंडियन महाराजांना विजयाच्या जवळ आणले. पठाणने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक ठोकला आणि इम्रान ताहिरचा (19 चेंडू) विक्रम मोडला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply