Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मेगा लिलावापूर्वी वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूने दाखवला दम, इंग्लंडविरुद्ध झळकावले शतक

मुंबई – आयपीएलसाठी 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा लिलाव होणार आहे. त्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या (West Indies) रोव्हमन पॉवेलने (Rovman Powell) शानदार शतक झळकावले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा संघ नियमित कर्णधार इऑन मॉर्गनशिवाय मैदानात उतरला होता. मोईन अली इंग्लंड संघाचे नेतृत्व करत होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विंडीज संघाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 224 धावा केल्या. पॉवेलने 53 चेंडूत 107 धावा केल्या. याशिवाय निकोलस पूरनने 43 चेंडूत 70 धावा केल्या.

Advertisement

प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 20 षटकांत नऊ गडी गमावून 204 धावाच करू शकला. इंग्लिश संघाकडून टॉम बॅंटनने 39 चेंडूत 73 धावा आणि फिलिप सॉल्टने 24 चेंडूत 57 धावा केल्या. याशिवाय इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पहिला T20 वेस्ट इंडिजने तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला होता.

Advertisement

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. 48 धावांत संघाच्या दोन विकेट पडल्या होत्या. यानंतर पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी रचली. 48 धावा करण्यासोबतच पूरनने टी-20 फॉरमॅटमध्ये 4000 धावाही पूर्ण केल्या. यानंतर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवे अर्धशतक झळकावले.

Loading...
Advertisement

यानंतर पॉवेलनेही अर्धशतक झळकावले. त्याने एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. पूरन 43 चेंडूत 70 धावा काढून बाद झाला. आंतरराष्ट्रीय टी-20मधली ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. पूरनने आपल्या खेळीत चार चौकार आणि पाच षटकार मारले. दुसऱ्या टोकाकडून पॉवेलने चौकार आणि षटकारांचा पाऊस सुरूच ठेवला. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा कॅरेबियन फलंदाज ठरला. त्याच्या आधी एविन लुईस आणि ख्रिस गेल यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत.

Advertisement

पॉवेल 53 चेंडूत 107 धावा काढून बाद झाला. त्याला लिव्हिंगस्टोनच्या हाती रीस टोपलीने झेलबाद केले. पॉवेलने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 10 षटकार मारले. अखेरीस, रोमारियो शेफर्ड पाच चेंडूत 11 धावा करून नाबाद राहिला आणि कर्णधार किरॉन पोलार्डने 4 चेंडूत 9 धावा केल्या. इंग्लंडकडून टोपली, जॉर्ज गार्टेन, टिमल मिल्स, लिव्हिंगस्टोन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply