Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोल्डन बॉय नीरज चोप्राला भारतीय लष्कर देणार हा विशेष पुरस्कार..

मुंबई- टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics2020) अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याचा प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) भारतीय लष्कराकडून ( Indian army) विशेष सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय लष्करातील 4 राजपुताना रायफल्सचे सुभेदार नीरज यांना परम विशिष्ट सेवा पदक (PVSM) देण्यात येणार आहे.(This special award will be given by Golden Army to Golden Boy Neeraj Chopra on the occasion of Republic Day.)

Advertisement

बुधवारी देश आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. याच्या पूर्वसंध्येला लष्करी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. नीरजच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्याला PVSM पुरस्कार देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

Advertisement

परम विशिष्ट सेवा पदक हा भारताचा एक लष्करी पुरस्कार आहे, जो शांततेसाठी आणि सेवेच्या क्षेत्रातील सर्वात अपवादात्मक कार्यासाठी दिला जातो.

Loading...
Advertisement

चोप्राने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला होता. त्यानंतर नीरजने 78.58 मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले.

Advertisement

नीरज चोप्रा हे भारतीय लष्कराच्या 4 राजपुताना रायफल्समध्ये सुभेदार म्हणूनही कार्यरत आहेत. सैन्यात असताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांना विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे, मात्र आता त्यांना परम विशिष्ट सेवा पदक मिळणार आहे.(This special award will be given by Golden Army to Golden Boy Neeraj Chopra on the occasion of Republic Day.)

Advertisement
Advertisement

Leave a Reply