Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र…Pro Kabbadi League मध्ये कोरोनाची एन्ट्री, आयोजकांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई- प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabbadi League) आठव्या हंगामावर कोरोनाची छाया पसरली आहे. बंगळुरूच्या शेरेटन ग्रँड व्हाईटफील्डवर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण (Corona Virus) झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मंगळवारी होणारा दुसरा सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे.(Err … Corona’s entry in Pro Kabbadi League, the organizers took a big decision)

Advertisement

सोमवारी मशाल स्पोर्ट्सने (Mashal Sport s) दोन्ही संघातील अनेक खेळाडूंना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. या कारणास्तव मंगळवारी एकच सामना खेळवला जाणार आहे. यासोबतच 25 ते 30 जानेवारी दरम्यान होणाऱ्या अनेक सामन्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. बाधित खेळाडूंनाही वेगळे करण्यात आले आहे.

Loading...
Advertisement

पाटणा पायरेट्स विरुध्द गुजरात जायंट्सचा (Patna Pirates vs Gujarat Giants) मंगळवारी सामना होणार होता, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. आता 25 ते 30 जानेवारीपर्यंत दररोज एकच सामना खेळवला जाणार आहे. लीग स्टेजचा पहिला हाफ यशस्वीरित्या पार पडला होता. मात्र, आता खेळाडूंना लागण झाल्यानंतर एकाच वेळी 12 खेळाडूंना मैदानात उतरवणे रिक्स असल्याचा आयोजकांचे मत आहे.

Advertisement

मशाल स्पोर्ट्स देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर 31 जानेवारीपासून दररोज दोन सामने खेळवले जाऊ शकतात. सामन्यादरम्यान सर्व खेळाडूंना मैदानात उतरवणे हा योग्य निर्णय होणार नाही, असे आयोजकांनी सोमवारी रात्री सांगितले होते. त्यामुळेच सामना घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. (Err … Corona’s entry in Pro Kabbadi League, the organizers took a big decision)

Advertisement
Advertisement

Leave a Reply