Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

प्रतिक्षा संपली, लखनऊने जाहीर केला नाव, आता ‘या’ नावाने ओळखले जाणार संघ

मुंबई- पुढील महिन्यात होणार्‍या आयपीएलच्या (IPL) मेगा लिलावाआधीच (Mega Auction) या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या नविन संघ लखनऊबद्दल (Lucknow) मोठी बातमी समोर आली आहे.(The wait is over, Lucknow has announced the name, now the team will be known as ‘this’)

Advertisement

लखनऊने आपल्या सांघाच्या नावाची घोषणा केली आहे. लखनौ फ्रँचायझीने काही दिवसांपूर्वी अधिकृतपणे केएल राहुलची (K.L.Rahul) कर्णधार म्हणून घोषणा केली होती, तर गौतम गंभीर (Gautam Gambhir) आधीच मार्गदर्शक म्हणून संघात सामील झाला होता. तेव्हापासून दोन्ही नव्या संघांची नावे काय असतील याकडे सर्व चाहते आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष लागून होते.

Loading...
Advertisement

आज गोएंका ग्रुपचे अध्यक्ष संजीव गोयंका (Sanjeev Goenka, Chairman, Goenka Group) यांनी संघाच्या नावाची घोषणा केली आहे. त्याने सांगितले की, संहूने नावासाठी लोकांचे मत मागवले होते. या अंतर्गत चाहत्यांसाठी “नाम बनाओ, नाम कमावो” ही ​​स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतरच लखनौ सुपर जायंटच्या नावाला सर्वाधिक मते मिळाली आणि त्यानंतर या गटावर शिक्कामोर्तब झाले. हे नाव जाहीर होताच ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि चर्चेचा विषय बनले आहे.

Advertisement

आयपीएल चे चाहते वेगवेगळ्या पद्धतीने या नावाचा स्वागत करत आहे तर काहीजण ट्रोल देखील करत आहे. आयपीएल 2022 साठी फेब्रुवारी 12 आणि 13 रोजी मेगा लिलाव बंगळुरूमध्ये (Bangalore) होणार आहे.(The wait is over, Lucknow has announced the name, now the team will be known as ‘this’)

Advertisement
Advertisement

Leave a Reply