Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण.., सोशल मीडियावर केला हे अहवान..

मुंबई – भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगला (Harbhajan Singh) कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. भज्जीने त्याच्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे की, त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना चाचणी करून घेण्यास सांगितले आहे. त्याच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून तो सध्या क्वारंटाईनमध्ये आहे.

Advertisement

भज्जीने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि भविष्यात पंजाबची सेवा करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.

Advertisement

हरभजनने लिहिले की, “मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला घरी क्वारंटाइन केले आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांना मी लवकरात लवकर चाचणी करून घेण्याची विनंती करतो. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या”.

Loading...
Advertisement

हरभजनने गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली होती. हरभजनने 23 वर्षात भारतासाठी 711 विकेट घेतल्या आहेत. निवृत्तीची घोषणा करताना हरभजनने ट्विटरवर लिहिले होते की सर्व चांगल्या गोष्टींचा अंत होतो आणि आज मी या खेळाला अलविदा करतो. या खेळाने मला आयुष्यात सर्व काही दिले आहे. हा 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. हरभजन दोन विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. हरभजन 2007 मध्ये T20 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता.

Advertisement

कसोटीत 400 हून अधिक विकेट घेणारा हरभजन सिंग हा भारताचा दुसरा फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या आधी अनिल कुंबळेने हा पराक्रम केला आहे. भज्जीने 103 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 417 विकेट घेतल्या आहे. तर 236 वनडेत 269 विकेट घेतल्या आहे. तर 28 टी-20 सामन्यांमध्ये भज्जीने 25 विकेट घेतल्या आहे. आयपीएलमध्ये हरभजनने 163 सामन्यात 150 विकेट घेतल्या आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply