Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

विराट ठरला हुशार..! म्हणून तत्काळ दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा; पहा, कुणी केलाय ‘हा’ खुलासा

मुंबई : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने 24 तासांच्या आत कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. तसेही बीसीसीआयने याआधी त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरुन काढून टाकले होते. त्यामुळे विराटचे कर्णधारपदही धोक्यात आले होते. त्यात आता क्रिकेट मंडळातील सूत्रांनी इनसाइड स्पोर्टला दिलेल्या माहितीत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Advertisement

टी 20 विश्वकप स्पर्धेच्या तोंडावर विराटने या स्पर्धेनंतर आपण संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे जाहीर करुन पहिला धक्का दिला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी पत्रकार परिषदेत घेत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. टी 20 संघाचे कर्णधारपद सोडताना आपणास कुणीही विनंती केली नाही, असे त्याने सांगितले. मात्र, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने अगदी उलट विधान केले होते. गांगुलीने स्वतः आपण विराटला टी 20 संघाचे कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती केल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा वाद वाढत असल्याचे पाहून बीसीसीआयने त्याच दिवशी रोहित शर्माला एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले.

Loading...
Advertisement

दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर बीसीसीआय स्वतःच विराटला कर्णधारपदावरून काढून टाकणार असल्याचे आता समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी पत्रकार परिषद घेत विराटने थेट सौरव गांगुलीला टार्गेट केले होते. त्यामुळे गांगुली सुद्धा संतापला होता. त्यात आता ही बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराटला कर्णधार पदावरुन काढून टाकणार असल्याचा मुद्दा चर्चेत आला. यावर सर्व सहमत होत नव्हते. विराट कोहलीला फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. जर त्याने स्वतः कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले नसते तर त्याला तसे करण्यास सांगितले गेले असते, असे बीसीसीआय सूत्रांनी InsideSport.IN ला सांगितले.

Advertisement

… म्हणून ‘या’ माजी क्रिकेटपटूने विराटला चांगलेच सुनावले; जाणून घ्या, कोणत्या वादाचे ठरतेय कारण ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply