अरे आहात ना तयार..! टी 20 वर्ल्डकप वेळापत्रक आले; पहा, कधी होणार भारत-पाकिस्तान सामना..?
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. 2015 च्या विश्वकप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे झाला होता. स्पर्धेचे पहिले 6 दिवस म्हणजे 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सामना होणार आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 चे सामने सुरू होतील.
T20 विश्वकप स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी सामने होतील. 13 नोव्हेंबर रोजी MCG येथे अंतिम सामना होईल. सुपर 12 साठी संघ दोन गटात विभागले गेले आहेत. गट 1 मध्ये सध्या ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तानचे संघ आहेत. दुसरीकडे भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश गट 2 मध्ये आहेत. पहिल्या फेरीच्या निकालानंतर या 8 संघांव्यतिरिक्त आणखी 4 संघ सुपर 12 मध्ये येतील. या स्पर्धेत एकूण 16 आंतरराष्ट्रीय संघ 45 सामने खेळणार आहेत.
टी-20 विश्वचषकात भारतीय संघास ग्रुप-2 मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात भारताबरोबरच बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे. भारतीय संघाचा दुसरा सामना 27 ऑक्टोबर रोजी गट 1 च्या उपविजेत्या संघाशी होणार आहे. यानंतर 30 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा सामना होणार आहे. त्यानंतर भारतीय 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरेल. शेवटच्या गट टप्प्यात, ते 6 नोव्हेंबर रोजी एमसीजी येथे ब गटातील विजेत्या संघाबरोबर सामना होणार आहे.
T20 विश्वकप 2022 चे उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. त्याच वेळी, त्याचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे.
विश्वकप स्पर्धेतील भारताचे सामने
भारत विरुद्ध पाकिस्तान – 23 ऑक्टोबर
भारत विरुद्ध गट अ उपविजेता – 27 ऑक्टोबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 30 ऑक्टोबर
भारत विरुद्ध बांगलादेश – 2 नोव्हेंबर
भारत विरुद्ध गट ब उपविजेता संघ – 06 नोव्हेंबर
‘त्या’ पराभवाचा भारताला बसला फटका.., आता आयसीसी…
अरे आहात ना तय्यार..! टी 20 वर्ल्डकपचे आले की वेळापत्रक; पहा कुठे होणार ही स्पर्धा..!