Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SA : ‘या’ खेळाडूला संघात घ्या आणि सामना जिंका; पहा, कुणी केलाय ‘हा’ दावा..?

मुंबई : दक्षिण आफ्रिकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा 31 रन्सने पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद केएल राहुलकडे आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघ निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यातील संघ निवडीवर जोरदार टीका केली आहे. संजय मांजरेकर यांच्या मते, संघाची मधली फळी कमकुवत दिसत आहे, त्यामुळे सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज संघात असणे आवश्यक आहे.

Advertisement

संजय मांजरेकर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, ‘संघाची मधली फळी कमकुवत दिसत आहे. तुमच्याकडे 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ऋषभ पंतसारखा फलंदाज आणि व्यंकटेश अय्यरसारखा अष्टपैलू खेळाडू असेल, तेव्हा सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज संघात असला पाहिजे. आम्हाला माहीत आहे की, नवीन फलंदाजांसाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणे सोपे नाही आणि अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवसारख्या फलंदाज असला पाहिजे, असे माझे मत आहे. मला वाटते की आता संघात काही बदल करणे गरजेचे आहे.

Advertisement

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर अवघे 17 रन्स करून बाद झाला. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर मात्र संघाची फलंदाजी पूर्ण कोसळली. श्रेयस अय्यरच्या या खराब कामगिरीने एक गोष्ट निश्चित केली की 5 व्या क्रमांकवर पोहोचणे त्याच्यासाठी शक्य नाही. कारण, या क्रमांकावर अशा फलंदाजाची गरज आहे, जो संघाला शेवटपर्यंत टिकवून ठेवतो आणि विजयापर्यंत नेतो आणि श्रेयस अय्यरला हे जमत नाही.

Loading...
Advertisement

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 21 जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरऐवजी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते, जो टीम इंडियासाठी एकहाती सामना जिंकू शकतो. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची जागा निश्चित झाल्याचे मानले जात आहे. टीम इंडियामध्ये सूर्यकुमार यादव हा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार मानला जातो.

Advertisement

… म्हणून श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आयपीएलसाठी एकदम तयार; जाणून घ्या, काय आहे महत्वाचे कारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply