मुंबई – रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेचा पहिला सीझन मध्ये सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांसारख्या दिग्गजांनी भाग घेतला होता, या स्पर्धेच्या दुसरा सीजन मार्च महिन्यात सुरू होणार आहे. माञ या आगोदरच आयोजकांना मोठा धक्का बसला आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज सचिन तेंडुलकरने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज स्पर्धेच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. आणि केवळ सचिनच नाही तर जगातील अनेक दिग्गजांनी यंदाच्या सीझनमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. मागच्या सीझनचे सचिनसह अनेक खेळाडूंचे अद्याप मानधन न मिळाल्याने सचिनने या सीझनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या सिझनमध्ये स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेल्या सचिन तेंडुलकरला पूर्ण मोबदला मिळू शकला नाही. यामुळे तो या स्पर्धेत खेळणार नाही. तसेच जगभरातील कोरोनाबाबतची परिस्थिती लक्षात घेता सचिन ने यावेळी माघार घेतल्याची देखील चर्चा आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार खालिद महमूद ‘सुजॉन’, खालिद मसूद ‘पायलट’, महराब हुसैन, राजीन सालेह, हन्नान सरकार आणि नफीस इक्बाल यांसारख्या अनेक माजी माजी खेळाडूंना अद्याप आयोजकांनी पैसे दिलेले नाहीत.
तेंडुलकर या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचा ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ देखील होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयुक्त सुनील गावस्कर होते. या मोसमात सचिन RSWS चा भाग असणार नाही. ही स्पर्धा 1 ते 19 मार्च दरम्यान UAE मध्ये खेळवण्याची योजना आहे, परंतु सचिन कोणत्याही स्वरूपात या स्पर्धेचा भाग असणार नाही. रवी गायकवाड हे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक होते. बहुतेक खेळाडूंनी मॅजेस्टिक लीजेंड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि पीएमजी नावाच्या कंपनीशी करार केला होता. संघांचे व्यवस्थापन सेकंड इनिंग्ज स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट नावाच्या कंपनीद्वारे केले जात होते. रवी गायकवाड यांनी 31 मार्च 2021 पर्यंत सर्वांना पैसे देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु काही काळानंतर त्यांनी कोणत्याही कॉलला उत्तर देण्यास नकार दिला.