अर्र.. टीम इंडियाला बसलाय आणखी एक धक्का..! आता ‘त्या’ क्रमवारीत ऑस्ट्रेलिया नंबर वन; जाणून घ्या, डिटेल
मुंबई : आयसीसीने कसोटी संघांची ताजी क्रमवारी जाहीर केली असून त्यात ऑस्ट्रेलियाला दुहेरी फायदा झाला आहे. तर दक्षिण आफ्रिके विरुद्धची कसोटी मालिका गमावलेल्या भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतीच 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. या उत्कृष्ट कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला त्याचा थेट फायदा आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत झाला आहे. आता यासह ऑस्ट्रेलिया संघ कसोटीत जगातील नंबर एक संघ बनला आहे. नवीन कसोटी संघ क्रमवारीनुसार, ऑस्ट्रेलियाने भारताला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून 1-2 अशा कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ कसोटी संघाच्या क्रमवारीत 2 क्रमांकांनी मागे पडला आहे. यासह भारत आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने मे 2020 नंतर प्रथमच कसोटी संघ क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाचे 119 गुण आहेत, तर भारताचे 116 गुण आहेत.
ताज्या कसोटी संघ क्रमवारीत प्रथम क्रमांकावर राहण्याबरोबरच ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा पराभव करुन आफ्रिकन संघ 5 व्या क्रमांकावर आहे. याशिवाय पाकिस्तान संघ सहाव्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वे संघासह श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश या संघांचा टॉप 10 मध्ये समावेश आहे.
दरम्यान, आता भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरू आहे. या मालिकेत तीन सामने होणार आहे. पहिला सामना टीम इंडियाने गमावल आहे. या मालिकेत रोहित शर्मा नाही. विराट कोहली आहे मात्र तो आता कर्णधार नाही. तर या मालिकेसाठी के. एल. राहुल संघाच्या कर्णधारपदी राहणार आहे. याआधी दुसऱ्या कसोटीत राहुल हा कर्णधार होता. मात्र, या कसोटीतही भारतीय संघास विजय मिळवता आला नाही. त्यानंतर आता एकदिवसीय मालिकेत संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
..म्हणून टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला; कर्णधार राहुलने सांगितली ‘ही’ कारणे..