Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

… म्हणून ‘या’ माजी क्रिकेटपटूने विराटला चांगलेच सुनावले; जाणून घ्या, कोणत्या वादाचे ठरतेय कारण ?

मुंबई : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला आणि कसोटी मालिकाही गमावली. या सामन्यात जो डीआरएस वाद निर्माण झाला होता, त्या मुद्द्यावर विराट कोहली याने थेट स्टंप माइक जवळ जात प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या सुपरस्पोर्ट्स चॅनेलवर टीका केली होती. त्यानंतर विराट कोहलीच्या या वर्तनावर काही माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली होती. या यादीत आता आणखी एका माजी खेळाडूची भर पडली आहे. होय, भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटला चांगलेच सुनावले आहे.

Advertisement

‘जेव्हा तुम्ही देशाचे प्रतिनिधीत्व करत असता. जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणाला सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करत असता, तेव्हा चिडचिड होणे किंवा राग येणे स्वाभाविक आहे. पण, विराट जे काही म्हणाला ते चालता-चालता म्हणाला असता तर वेगळी गोष्ट होती. त्याने थेट स्टंप माईकजवळ येत तसे विधान केले. हे योग्य नाही. कारण, अशा वेळी तुम्ही जे काही म्हणता ते अगदी स्पष्टपणे ऐकू येते आणि त्याचा परिणाम फार विचित्र होतो. अशा वेळी ही गोष्ट टाळता येते.’

Advertisement

‘मैदानात बरेच खेळाडू आक्रमक होतात त्यात नवीन काहीच नाही. त्यावेळी ते खेळाडू मुद्दाम तसे वागतात, असे मला म्हणायचे नाही. पण, असा विचार करा की हा सामना आपल्या देशात असता आणि विदेशी संघाच्या कर्णधाराने असे काही केले असते तर येथील नागरिकांना कसे वाटले असते, भारतीयांनी नक्कीच ते स्वीकारले नसते.’ अशा शब्दांत गावसकर यांनी विराटला सुनावले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, आता या नंतर दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिका होणार आहे. या मालिकेत तीन सामने होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा नाही. विराट कोहली आहे मात्र तो आता कर्णधार नाही. तर या मालिकेसाठी के. एल. राहुल संघाच्या कर्णधारपदी राहणार आहे. याआधी दुसऱ्या कसोटीत राहुल हा कर्णधार होता. मात्र, या कसोटीतही भारतीय संघास विजय मिळवता आला नाही. त्यानंतर आता एकदिवसीय मालिकेत संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

.. म्हणून आता विराटने ‘तसे’ करायला हवे.. ‘या’ दिग्गज माजी क्रिकेटपटूने विराटबद्दल सांगितले ‘असे’ काही..

Advertisement
Advertisement

Leave a Reply