Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कसोटी संघाचा कर्णधार कोण..? ; आता ‘या’ खेळाडूनही केलाय दावा; पहा, काय सुरू आहे क्रिकेट विश्वात ?

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. यावेळी एकदिवसीय संघाचा कर्णधार के. एल. राहुल आहे. रोहित शर्माच्या दुखापतीनंतर केएल राहुलला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. सामन्याआधी पत्रकार परिषदेत राहुल कसोटी कर्णधाराच्या प्रश्नावर म्हणाला, की मला जोहान्सबर्गमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. जे खूप खास होते. जिंकलो नाही, पण मी संघाचे नेतृत्व केले याचा मला अभिमान आहे. देशाचे कर्णधारपद मिळणे ही प्रत्येकासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मला संधी मिळाली तर मी संघाला आघाडीवर नेईन.

Advertisement

आता विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर टीम इंडियामध्ये या पदासाठी अनेक दावेदार आहेत. तरी देखील कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्माचे नाव निश्चित आहे, असे सांगण्यात येत आहे. तरी देखील अन्य काही खेळाडूंची नावेही समोर येत आहेत. केएल राहुलने माजी कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले. तो म्हणाला, की विराटच्या नेतृत्वात आम्ही देशाबाहेर मालिका जिंकली आहे, असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. सध्याच्या संघात विजयाचा आत्मविश्वास मुख्यत्वे कर्णधार विराट कोहलीवर आहे.

Advertisement

राहुल म्हणाला, की गेल्या 14-15 महिन्यांत मी संघाच्या गरजेनुसार फलंदाजी केली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मी आघाडीवर असणार आहे. धोनी आणि विराटने संघाला पुढे नेले आहे. आमचा संघ आता सामने जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परंतु, सुधारणा करण्यास नेहमीच वाव असतो. त्यामुळे आम्ही कठोर परिश्रम करत आहोत. कर्णधार म्हणून प्रत्येक खेळाडूने मला पाठिंबा द्यावा आणि त्यांना चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहन द्यावे असे मला वाटते.

Loading...
Advertisement

दरम्यान, कसोटी मालिकेतील पराभवाचा एकदिवसीय सामन्यात बदला घेण्याची संधी भारतीय संघाला असेल. आफ्रिकेचा धडाकेबाज गोलंदाज कागिसो रबाडा संघात नसल्यामुळे आफ्रिका संघाची गोलंदाजी थोडी कमकुवत असेल, त्यामुळे चांगले रन करण्याची संधी भारतीय संघाला मिळेल. त्यामुळे आता संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

IND vs SA : भारतीय संघासाठी खुशखबर..! आफ्रिकेचा ‘तो’ धडाकेबाज खेळाडू एकदिवसीय मालिकेतून बाहेर

Advertisement
Advertisement

Leave a Reply