Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘हा’ दिग्गज खेळाडू म्हणतो आता कोहलीला अहंकार सोडावा लागेल नाही तर…

मुंबई – विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी कर्णधारपद सोडल्याने आता तो T20, ODI नंतर कसोटीतही दुसऱ्या कर्णधाराच्या हाताखाली खेळताना दिसणार आहे. त्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेने होणार आहे. ऑक्टोबर 2016 नंतर तो प्रथमच दुसऱ्या कर्णधाराखाली एकदिवसीय सामना खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलला कर्णधार बनवण्यात आले आहे. या मालिकेपूर्वी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर आणि कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे.

Advertisement

कपिलने कोहलीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्याचवेळी, त्याला आपला अहंकार सोडून नवीन कर्णधारपदाखाली चांगली कामगिरी करण्यास सांगितले आहे. कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. आता कर्णधारपदाचे दडपण दूर झाल्यानंतर कोहली मुक्तपणे खेळू शकणार आहे. तो काही काळ खूप दबावाचा सामना करत होता. आता तो फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकतो.

Advertisement

पुढे कपिल म्हणाला की कोहलीला आधी अहंकार सोडावा लागेल, कारण तो कर्णधार नाही. त्याला संघासोबत पुढे जावे लागेल. त्यांना युवा खेळाडूंमध्ये खेळण्याची सवय लावावी लागेल. याचा फायदा त्याला आणि भारतीय क्रिकेटला होईल. विराटकडे भरपूर अनुभव असून तो युवा खेळाडूंना मदत करू शकतो. कोहलीला एक फलंदाज म्हणून गमावण्याची आमच्यात सध्या क्षमता नाही. कोणत्याही परिस्थितित नाही. तो सर्वोत्तम फलंदाज आहे.

Loading...
Advertisement

सुनील गावसकर यांनाही माझ्या नेतृत्वाखाली खेळावे लागले तो माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ होते. मी स्वतः श्रीकांत आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली खेळलो. माझ्यात अहंकार नव्हता. आम्हाला कोहलीला फलंदाज म्हणून वाढताना पाहायचे आहे.

Advertisement

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिला सामना पार्ल येथे होणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply