Take a fresh look at your lifestyle.

अहमदाबाद नंतर लखनऊने उघडले आपले पत्ते, ‘या’ स्टार फलंदाजाकडे सोपविले नेतृत्व

मुंबई – आयपीएल 2022 (IPL 2022) सहभागी होणाऱ्या दोन्ही नवीन संघांनी मेगा लीलावापुर्वी प्रत्येकी तीन-तीन खेळाडूंची निवड केली आहे. अहमदाबादने सोमवारी हार्दिक पांड्या, रशीद खान आणि शुभमन गिल यांची निवड केली आहे. त्याचबरोबर आता लखनऊनेही आपले तीन खेळाडू निवडले आहेत.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलला ( K.L.Rahul) लखनऊने आपल्या संघात सामील केले आहे. यापूर्वीही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये अशी बातमी आली होती की राहुल या फ्रँचायझीमध्ये सामील होऊ शकतो. त्याला लखनऊ संघाचा कर्णधारही करण्यात येणार आहे. याशिवाय, लखनऊ फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि भारताचा अनकॅप्ड लेग-स्पिनर रवी बिश्नोई यांचा त्यांच्या संघात समावेश केला आहे.

Advertisement

लखनऊ फ्रँचायझी राहुलला 15 कोटी, स्टोइनिसला 11 कोटी आणि बिश्नोईला 4 कोटी देणार आहे. फ्रँचायझी 60 कोटी रुपयांसह मेगा लिलावात उतरणार आहे. 29 वर्षीय राहुल IPL 2018 पासून या लीगमधील सर्वात सातत्यपूर्ण फलंदाज ठरला आहे. त्याने आपली जुनी फ्रेंचायझी पंजाब किंग्जला सोडण्याबाबत आधीच कळवले होते. त्यामुळे पंजाबने त्याला कायम ठेवले नाही. राहुल गेल्या दोन मोसमात पंजाबचा कर्णधार होता.

Advertisement

मार्कस स्टॉइनिससाठी लखनऊ ही आयपीएलची चौथी फ्रँचायझी असेल. त्याने 2015 मध्ये दिल्ली कॅपिटल्समधून त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तो पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनही खेळला. 2020 मध्ये दिल्लीने त्याला 4.8 कोटी रुपयांना परत विकत घेतले होते. दिल्लीकडून खेळलेल्या 27 सामन्यांमध्ये 32 वर्षीय स्टॉइनिसने 142.71 च्या स्ट्राइक रेटने 441 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 15 विकेट्सही घेतल्या आहेत.

Advertisement

लेगस्पिनर रवी बिश्नोई 2020 च्या अंडर-19 विश्वचषकापासून चमकला आहे. तो त्या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. 2020 मध्ये पंजाबने रवीला दोन कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने 14 सामन्यात 12 विकेट घेतल्या. तर 2021 च्या आयपीएलमध्ये रवीने 9 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply