Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: साडे 12 कोटी घेणाऱ्या ‘या’ स्टार खेळाडूंने मेगा लिलावापूर्वी IPL मधून घेतली माघार

मुंबई – दोन दिवसापूर्वीच इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने ( Joe Root) IPL 2022 च्या मेगा लिलावात (mega auction) सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सनेही (Ben Stokes) मेगा लिलावामध्ये आपले नाव न नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही क्रिकेटपटू यंदा आयपीएल खेळताना दिसणार नाही.(IPL 2022: ‘This’ star players taking Rs 12.5 crore Withdrew from IPL before mega auction)

Advertisement

पुढच्या महिन्यात होणाऱ्या मेगा लिलावात मोठ्या रकमेत स्टोक्सला खरेदी केले जाईल, अशी अपेक्षा होती. माञ आता त्याच्या अनुपस्थितीमुळे फ्रँचायझीला मोठा धक्का बसला आहे. स्टोक्स स्वत:च्या जोरावर सामने फिरवण्यात मास्टर आहे.

Advertisement

रूट आणि स्टोक्स आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळतील. रूटने गेल्या आठवड्यात आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Advertisement

ऍशेस मालिकेतील पाचव्या सामन्यातील पराभवानंतर तो पत्रकार परिषदेत म्हणाला – या संघाला खूप सुधारणा करण्याची गरज आहे. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट सर्वोपरि आहे आणि त्यासाठी मी सर्वकाही त्याग करू शकतो. रूटने मे 2019 मध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

Advertisement

स्टोक्स हा आयपीएलमधील संघांचा आवडता खेळाडू आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना 2017 मध्ये आयपीएलमध्ये तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू होता. तसेच 2018 च्या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने साडे 12 कोटी रुपयांना खरेदी केले होते. (IPL 2022: ‘This’ star players taking Rs 12.5 crore Withdrew from IPL before mega auction)

Advertisement
Advertisement

Leave a Reply