Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SA:पहिल्या ODI मध्ये कोणाची लागणार लॉटरी? जाणून घ्या टीम इंडियाचे प्लेइंग-11

मुंबई – 19 जानेवारीपासून भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका (ODI series) सुरू होणार आहे. भारतीय संघ प्रथमच के. एल. राहुलच्या (K L.Rahul) नेतृत्वाखाली एकदिवसीय सामन्यात उतरणार आहे.

Advertisement

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्मा जखमी झाल्याने कर्णधारपदाची जबाबदरी राहुलकडे देण्यात आली आहे तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

Advertisement

तर दुसरीकडे बुधवारी जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरेल तेव्हा ऑक्टोबर 2016 नंतर प्रथमच विराट कोहली कर्णधार म्हणून नाही तर एक खेळाडू म्हणून मैदानात उतरेल. आता या भूमिकेत तो स्वत:ला कसा प्रस्थापित करतो हे पहावा लागेल. सध्या कसोटीत त्याचा फॉर्म चांगला नसला तरी एकदिवसीय सामन्यात त्याची कामगिरी चांगली आहे. 2020 पासून, कोहलीने 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 46.66 च्या सरासरीने आणि 90.90 च्या स्ट्राइक रेटने 560 धावा केल्या आहेत. या मालिकेत मधल्या फळीची जबाबदारी त्याच्यावर असेल.

Advertisement

ऋतुराज गायकवाडला मिळणार का संधी ?

Loading...
Advertisement

विजय हजारे स्पर्धेत ऋतुराज गायकवाड चांगलाच फॉर्मात होता. त्याने पाच सामन्यात 603 धावा केले आहे. यामध्ये चार शानदार शतकांचा समावेश आहे. त्यामूळे त्याला उद्या होणाऱ्या सामन्यात संधी भेटणार का याची चर्चा जोराने सूरु आहे. माञ समोर आलेल्या माहितीनुसार पाहिल्या सामन्यांत त्याला संधी मिळणार नाही. त्याच्या जागी भारतीय संघात पुनरागमन करणारा शिखर धवनला संधी देण्यात येणार आहे.

Advertisement

भारताचे संभाव्य अंतिम 11 

Advertisement

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर/व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, रविचंद्रन अश्विन/युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार/ मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

Advertisement
Advertisement

Leave a Reply