Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून आता विराटने ‘तसे’ करायला हवे.. ‘या’ दिग्गज माजी क्रिकेटपटूने विराटबद्दल सांगितले ‘असे’ काही..

मुंबई : कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊन क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारा विराट कोहली सध्या कोणतीही तडजोड करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. बोर्डाने त्याला 100 व्या कसोटीत कर्णधारपदाची ऑफर दिली होती. मात्र, ही ऑफर सुद्धा त्याने नाकारली. एकूणच, विराटच्या स्वभावावर आता माजी क्रिकेटपटूही प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. विराटने त्याच्या स्वभावात बदल करण्याची जास्त गरज आहे, असे या क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे. आताही माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनीही विराट कोहलीला मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

Advertisement

कपिल देव म्हणाले, की ‘विराटसाठी सध्याचा काळ कसोटीचा आहे. पण, त्याने शांतपणे निर्णय घ्यावेत. दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वात खेळणे आजिबात वाईट नाही. सुनील गावसकर माझ्या नेतृत्वात संघात होते. माझ्यात आजिबात अहंकार नव्हता. विराटने आता आपला अहंकार बाजूला ठेवायला हवा आणि नव्या दमाच्या कर्णधाराच्या नेतृत्वात संघात राहणे शिकायला हवे. त्याचा विराट आणि क्रिकेट संघालाही फायदा होणार आहे.’

Loading...
Advertisement

‘विराट हा अनुभवी खेळाडू आणि कर्णधार आहे. त्यामुळे आता नव्या कर्णधाराला मार्गदर्शन करायला हवे. तसेच नव्या खेळाडूंनाही त्याने क्रिकेटचे धडे द्यायला हवेत. कारण, विराट हा फलंदाज म्हणून सर्वोत्तम आहे आणि असा खेळाडू गमावणे भारतीय क्रिकेटला परवडणारे नाही’, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, विराटने टी-20 क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर बोर्डाने त्याच्याकडून एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपदही काढून घेतले. आता विराटने कसोटीचे कर्णधारपदही सोडले आहे. म्हणजेच भारत आता कसोटी क्रिकेटसाठी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी-20 साठी कर्णधार बनवण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाच्या शर्यतीतही तो आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंतही स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बोर्डाने कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्माचे नाव जवळपास निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply