Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कर्णधार म्हणून कोहलीला कोण करणार रिप्लेस? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय..

मुंबई – विराट कोहलीने (Virat Kohli) अचानकपणे कसोटी संघाचा (Test Team) कर्णधार पद सोडल्याने आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण होणार याची चर्चा जोराने सूरु आहे. माजी खेळाडू देखील काही नाव समोर ठेवत आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार पुढच्या कर्णधारपदासाठी रोहीत शर्मा (Rohit Sharma) आणि के.एल.राहूल (K.L. Rahul) या दोन स्टार खेळाडूंचे नाव सर्वात पुढे आहे.

Advertisement

रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाचा उपकर्णधार होता त्यामूळे तो या शर्यतीमध्ये सर्वात पुढे असुन समोर आलेल्या माहितीनुसार तोच पुढचा कर्णधार होणार आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका ही कर्णधार म्हणून त्याची पहिली जबाबदारी असेल. तर वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत, रोहित जेव्हा जेव्हा ब्रेक घेणार तेव्हा के.एल राहुलकडे कमांड दिली जाऊ शकते.

Loading...
Advertisement

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. माञ आता कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारताचा पुढील कसोटी कर्णधार कोण असेल हे पाहावे लागेल. तसे पाहता, रोहित शर्मा याची कर्णधार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. रोहितला वनडे आणि टी-२० चे कर्णधार बनवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय तिन्ही फॉर्मेट मध्ये एक कर्णधाराची रणनीती पुढे करत रोहितला पुढील कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करू शकते.

Advertisement

तर दुसरीकडे केएल राहुलही रांगेत आहे. राहुलने आयपीएलचे कर्णधारपद भूषवले असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतही तो कर्णधार असणार आहे. वनडे मालिकेतील त्याचे कर्णधारपद पाहून बीसीसीआय आणखी काही निर्णय घेऊ शकते. याशिवाय अश्विनच्या नावाचीही चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Who will replace Kohli as captain? BCCI to take big decision)

Advertisement
Advertisement

Leave a Reply