Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कसोटी संघाचा कर्णधार कोण होणार? बुमराहने दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला जर…

मुंबई – 19 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी (South Africa) भारतीय संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) याने भारताच्या कसोटी संघाचा पुढील कर्णधार कोण होणार यावर मोठी प्रतिक्रीया दिली आहे.

Advertisement

संधी मिळाल्यास कसोटीत भारताचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे बुमराहने म्हटले आहे. आज तो पत्रकार परिषदेत बोलत होता.

Advertisement

तर दुसरीकडे विराटबद्दल बोलताना बुमराह म्हणाला की तो अजूनही लोकेश राहुलला कर्णधारपदाखाली मदत करेल आणि तो मोठे निर्णय घेण्यात योगदान देईल. सिराजच्या फिटनेसबद्दल त्याने सांगितले की तो बरा झाला आहे आणि एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्यादरम्यान सिराजच्या स्नायूंना दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला गोलंदाजी करताना खूप त्रास झाला. यानंतर त्याच्या वनडे मालिकेत खेळण्याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, बुमराहने तो तंदुरुस्त असून संघासोबत तयारी करत असल्याचे सांगितले आहे.

Loading...
Advertisement

कर्णधार बदलल्याने फारसा फरक पडणार नाही

Advertisement

भारताचा कर्णधार बदलल्याने संघात काय फरक पडतो? या प्रश्नाला उत्तर देताना बुमराह म्हणाला की, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. संघातील प्रत्येकजण हा बदल कसा हाताळतो हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक खेळाडू आपण काय योगदान देऊ शकतो याचा विचार करत असतो. एक संघ म्हणून आम्ही सकारात्मक आहोत आणि योगदान देण्यास उत्सुक आहोत. दुसरीकडे 2023 च्या विश्वचषकाबाबत ते म्हणाले की, 2023 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून तयारी केली जात आहे, मात्र प्रत्येक मालिकेला महत्त्व दिले जाईल.(Who will be the captain of the Test team? Bumrah gave a big response, saying if …)

Advertisement
Advertisement

Leave a Reply