Take a fresh look at your lifestyle.

ऑस्ट्रेलियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा, अॅशेस मध्ये गाजवले पुन्हा वर्चस्व

मुंबई –  अॅशेस मालिकेच्या (Ashes series) शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडला (England) 146 धावांनी पराभूत करुन पाच सामन्यांची मालिका 4-0 ने जिंकली.पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडवर संपुर्ण वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या तीन सामन्यात इंग्लंडचा पराभव केला तर चौथा सामना अनिर्णित राहिला. मात्र, अखेरच्या कसोटी सामन्यात यजमानांनी पुन्हा जोरदार पुनरागमन करत इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव केला.(Ashes 2022: Australia beat England, dominating the Ashes)

Advertisement

पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात कर्णधार कमिन्ससह कॅमेरॉन ग्रीन आणि स्कॉट बोलँड यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी इंग्लंडला 124 धावांत गुंडाळले. यासह यजमानांनी शेवटचा सामना जिंकून पाच सामन्यांची अॅशेस मालिका 4-0 अशी खिशात घातली.

Advertisement

होबार्ट येथे खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ट्रॅव्हिस हेड (101) आणि कॅमेरॉन ग्रीन (74) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 303 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आणि 188 धावांवर गारद झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 115 धावांच्या आघाडीसह फलंदाजीसाठी उतरला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 271 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Advertisement

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची फलंदाजी पुन्हा एकदा ढासळली. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संपूर्ण संघ 124 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.(Ashes 2022: Australia beat England, dominating the Ashes)

Advertisement
Advertisement

Leave a Reply