Take a fresh look at your lifestyle.

विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर सौरव गांगुलीने दिली ही प्रतिक्रिया….

मुंबई –  सर्वांना धक्का देत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) अचानकपणे भारतीय कसोटी संघाचा कर्णधारपद सोडल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना जोर आला आहे. याच दरम्यान बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.(This is the reaction of Sourav Ganguly to Virat Kohli’s ‘that’ decision ….)

Advertisement

सौरव गांगुली यांनी भारतीय कर्णधार म्हणून खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाला पुढे नेण्यात कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्याचे कौतुक केले, माञ कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद सोडल्याचा निर्णय हा विराटचा वैयक्तिक आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
कोहलीने शनिवारी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून सात वर्षांच्या कर्णधार कारकिर्दीचा शेवट केला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 68 कसोटी सामने खेळले त्यापैकी 40 जिंकले त्याच्या नेतृत्वाखाली संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात देखील विजय नोंदवले आहे.

Advertisement

गांगुलीने बीसीसीआय आणि कोहलीला ‘टॅग’ करत ट्विट करत म्हणाले की विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये प्रगती केली . त्याचा निर्णय वैयक्तिक आहे आणि बीसीसीआय त्याचा खूप आदर करते. भविष्यात या संघाला नवीन उंचीवर नेण्यासाठी तो एक महत्त्वाचा सदस्य असेल.

Advertisement

कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्यापाठोपाठ महेंद्रसिंग धोनी (27 विजय) आणि गांगुली (21 विजय) यांचा क्रमांक लागतो. कोहलीने सोशल मीडियावर पत्र लिहून कर्णधारपदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीने आपल्या पत्रात लिहिले की, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत असतो. माझ्या कर्णधारपदाचा हा शेवट आहे. आपल्या पत्रात कोहलीने बीसीसीआय आणि धोनीचेही आभार मानले आहेत.(This is the reaction of Sourav Ganguly to Virat Kohli’s ‘that’ decision ….)

Advertisement
Advertisement

Leave a Reply