मुंबई – वेस्टइंडीज येथे सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषकाची (Under 19 World Cup) सुरुवात भारताने (Team India) विजयाने केली आहे. भारताने गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आफ्रिकेचा (South Africa) 45 धावांनी पराभव केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 46.5 षटकात 232 धावा करत सर्वबाद झाला होता. 233 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.4 षटकांत 187 धावांवर गारद झाला. कर्णधार यश धुल आणि फिरकी गोलंदाज विकी ओस्तवाल हे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. धुलने 82 धावांची खेळी खेळली. तर दुसरीकडे विकीने चांगली गोलंदाजी करताना पाच विकेट्स घेतले.
फलंदाजी करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली होती. अवघ्या 11 धावांवर भारतीय संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावले होते.यानंतर शेख रशीद आणि कर्णधार यश धुल यांनी डावाची धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली.
रशीदने 54 चेंडूत 31 धावाचा योगदान दिला. त्यानंतर यशने निशांत सिंधू, राज बावा आणि कौशल तांबे यांच्यासोबत छोट्या पण महत्त्वाच्या भागीदारी केल्या आणि संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. माञ कर्णधार यशच्या रनआऊटनंतर संपूर्ण संघ 46.5 षटकांत 232 धावांवर गारद झाला.
हा सामना जिंकून भारताच्या युवा संघाने कसोटी मालिकेत सीनियर भारतीय संघाचा झालेला पराभवाचा बदलाही घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता. मागच्या काही सामन्यांमध्ये भारतीय अंडर-19 संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून संघ खूपच मजबूत दिसत आहे. नुकताच टीम इंडियाने अंडर-19 आशिया कप जिंकला होता.(Under 19 World Cup: Young Brigade got off to a great start, avenging their defeat)